खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक संभाजी करलकर यांचे निधन..

खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक संभाजी करलकर यांचे निधन..

खारेपाटण /-

कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायक या पदावर कार्यरत असलेले संभाजी वासुदेव करलकर यांचे आज पहाटे मुंबई नायर हॊस्पिटल येथे अल्पशा आजाराने वयाच्या ४४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच खारेपाटण येथे समजताच खारेपाटण प्रा. आ. केंद्रासह दशक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आरोग्य सहाय्यक संभाजी करलकर यांचे मुळगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात परुळे येथे असून खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गेली ४ वर्षे आरोग्य सहाय्याक म्हणून काम करत होते. ऐन कोरोनाच्या महामारीत देखील खारेपाटण मध्ये त्यांनी कोरोनाला न घाबरता बिनधास्तपणे चांगले काम केले होते. खारेपाटण येथे येण्यापूर्वी त्यानी नांदगाव, साकेडी आदी ठिकाणी आरोग्य सेवक म्हणून काम केले होते. खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी वर्गाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे.

अभिप्राय द्या..