हरित लवादाकडे तक्रार करणार.;भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा इशारा..

हरित लवादाकडे तक्रार करणार.;भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा इशारा..

सावंतवाडी /-

कळणे मायनिंग कोसळून तेथील रस्त्यांवर आणि ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी व चिखल गेला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करून देखील प्रशासनाने दखल न घेतल्याने हा प्रकार आज घडला असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला आहे. मायनिंग कंपन्यांनी चुकीच्या प्रकारे केलेल्या उत्खननामुळे हा प्रकार घडला असून, या उत्खननाला प्रशासनाचा पाठींबा असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.आतातरी प्रशासनाने डोळे उघडुन चुकीच्या प्रकारे होणाऱ्या उत्खननाची चौकशी करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. पण आता ही जर प्रशासनाने यावर योग्य कारवाई न केल्यास हरित लवादाकडे आपण तक्रार करु असा इशारा राजन तेली यांनी दिला आहे.

अभिप्राय द्या..