परिषदेत कर्मचारी बदली प्रक्रिया समुपदेशनाने पडली पार.;४२ विनंती, ८ प्रशासकीय बदल्यांचा समावेश..

परिषदेत कर्मचारी बदली प्रक्रिया समुपदेशनाने पडली पार.;४२ विनंती, ८ प्रशासकीय बदल्यांचा समावेश..

सिंधुदुर्गनगरी /-

राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेत गुरुवारी प्रशासकीय व विनंती बदली समुपदेशन पद्धतीने प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. यावेळी ४२ विनंती व ८ प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. राज्य शासनाने एकूण पदांच्या १० टक्के विनंती व १० टक्के प्रशासकीय बदली प्रक्रिया ३१ जुलै २०२१ पूर्वी राबविण्याचे आदेश दिले होते. गतवर्षी ही बदली प्रक्रिया कोरोना प्रादुर्भावमुळे होवू शकल्या नव्हत्या. आज राबविण्यात आलेल्या बदली प्रक्रियेला उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, विषय समिती सभापती महेंद्र चव्हाण, डॉ अनिशा दळवी, शर्वाणी गांवकर, अंकुश जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, वित्त व लेखा अधिकारी मदन भिसे यांच्यासह विविध खात्याचे खातेप्रमुख उपस्थित होते. प्रशासकीय बदलीसाठी एकूण १७ अर्ज आले होते. यात सामान्य प्रशासन ६, वित्त विभाग २, कृषी विभाग २, बालकल्याण विभाग २ तर शिक्षण विभाग, बांधकाम विभाग २ ग्रामीण पाणी पुरवठा आणि लघु पाटबंधारे या विभागाच्या प्रत्येकी एका कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यातील आठ प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत. सामान्य प्रशासन पाच, बांधकाम विभाग एक, शिक्षण व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रत्येकी एक कर्मचारी असा समावेश आहे. विनंती बदली एकूण ४२ हजार कर्मचाऱ्यांची करण्यात आली आहे. यामध्ये सामान्य प्रशासन १२, वित्त विभाग २, ग्राम पंचायत विभाग १३, आरोग्य विभाग ९, बालकल्याण विभाग २, शिक्षण विभाग ३, ग्रामीण पाणी पुरवठा १ अशाप्रकारे समावेश आहे. बदलीसाठी अधीक्षक, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, परिचर, ग्रामसेवक, शाखा अभियंता, आरोग्य सेवक-सेविका, आरोग्य सहाय्यक-सहाय्यीक यांचा समावेश होता.

अभिप्राय द्या..