भुईबावडा व करूळ घाट तसेच शेजारील भुस्खलन झालेल्या परिसराचा कोल्हापूर कोल्हापूर प्रशासनाने केली पाहणी..

भुईबावडा व करूळ घाट तसेच शेजारील भुस्खलन झालेल्या परिसराचा कोल्हापूर कोल्हापूर प्रशासनाने केली पाहणी..

वैभववाडी /-

कोकण व घाटमाथा यांचा प्रमुख दुवा असलेला भुईबावडा व करूळ घाटांची जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. करुळ घाटात खचलेला मोरीचा भाग भुईबावडा घाटात रस्त्याच्या मधोमध पडलेल्या भेगा आदी ठिकाणांची त्यांनी पाहणी केली. तसेच अंदुर ते धुंदवडे खचलेला रस्ता, मांडुकली येथील डोंगर खचून पाण्याचा प्रवाहाबरोबर आलेली माती, दगड, झाडे यांनी ऊस,भात पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तहसिलदार डॉ. संगमेश कोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..