दोडामार्ग /-

कळणे परिसराला भूस्खलनाचा फटका बसला आहे. कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचल्याचं दिसून येतंय. भूस्खलन झाल्याने तेथील काही भाग खाणीत कोसळला आहे. त्यामुळे खाणीतील पाणी व चिखलयुक्त माती परिसरातील शेतीत, लोकवस्तीत येत आहे. रस्त्यावर चिखल आल्याने कळणे-तळकट मार्ग तूर्तास बंद करण्यात आला आहे. परिणामी दोन्ही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page