कातकरी बांधवांनी नगराध्यक्ष नलावडे यांचे मानले आभार.;पुरात जीवनावश्यक वस्तू दिल्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता..

कातकरी बांधवांनी नगराध्यक्ष नलावडे यांचे मानले आभार.;पुरात जीवनावश्यक वस्तू दिल्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता..

कणकवली /-

22 आणि 23 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीचा फटका कणकवली शहरातील कातकरी वस्तीला बसला. कातकरी बांधवांच्या वस्तीत पाणी शिरून त्यांचा संसार होत्याचा नव्हता झाला. अशा कठीण प्रसंगात कणकवली नगराध्यक समीर नलावडे यांनी कातकरी बांधवाना मदतीचा हात देत त्यांचा संसार पुन्हा उभा करण्यास मदत केली. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. आता पूर ओसरून सर्वांचे जीवन पुन्हा सुरळीत झाले असले तरी संकटकाळात नगराध्यक्ष नलावडे यांनी केलेली मदत कातकरी बांधव विसरले नाहीत. आज कातकरी बांधवांनी नगराध्यक्ष नलावडे यांची भेट घेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, अखंड लोकमंच चे नामानंद मोडक, शैलजा, आरोग्य सभापती अभि मुसळे, गटनेता संजय कामतेकर, नगरसेवक ऍड. विराज भोसले, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे उपस्थित होते.

अभिप्राय द्या..