पारंपारिक रापण मच्छिमारांना अडथळा आणणारे दगड हटवण्याची भाजपाची मागणी

पारंपारिक रापण मच्छिमारांना अडथळा आणणारे दगड हटवण्याची भाजपाची मागणी

वेंगुर्ला / –

मच्छिमारांच्या मागणीनुसार मांडवी खाडी मुखाच्या ठिकाणी आधुनिक बंधारा ( ब्रेक वाॅटर ) बांधकामासाठी तयार करण्यात आलेले सिमेंट काँक्रीटचे त्रिशंकु आकाराचे दगड हे नवाबाग किनारी भागात अस्ताव्यस्त टाकले गेल्याने पारंपारिक रापण मच्छिमारी व बीगर यांत्रिकी मच्छिमारीस मोठा अडथळा निर्माण झाले आहे.त्यामुळे सदरचे त्रिशंकु दगड तातडीने हटवण्याची मागणी रापण संघाच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.पारंपारिक मच्छिमारांच्या मागणी नुसार भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी उभादांडा – नवाबाग किनारी भेट दिली व मच्छिमारांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर,भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , रापण संघाचे सुबोध खडपकर , रामचंद्र आरावंदेकर , मनोहर टाककर , मच्छिमार संस्थेचे संचालक अशोक खराडे , विक्रांत सारंग , जितेंद्र टाककर , योगेश मोर्जे , विश्वनाथ खराडे इत्यादी मच्छिमार बांधव उपस्थित होते .
त्यानंतर जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मच्छिमार बांधवांसोबत तहसिलदार प्रविण लोकरे यांची भेट घेऊन मच्छिमारांना अडथळा आणनारे दगड ठेकेदाराकडुन ताबडतोब काढून घ्यावेत अशी मागणी केली. यावेळी सहा.मत्स्य.अधिकारी जोशी उपस्थित होते . तसेच ह्या प्रश्नी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मच्छिमारांचा सांगितले.

अभिप्राय द्या..