शिवसेना माजी तालुका प्रमुख बंडू मुंडले यांचे निधन..

शिवसेना माजी तालुका प्रमुख बंडू मुंडले यांचे निधन..


वैभववाडी/-


वैभववाडी तालुका शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत उर्फ बंडू केशव मुंडल्ये (६१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. रविवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वसंत बुडले हे बंडु काका या ऊर्फ नावाने सर्वञ परिचीत होते.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. शिवसेनेत असताना त्यांनी सुमारे १५ वर्षे वैभववाडी तालुकाप्रमुख म्हणून काम पाहिले. आपल्या तालुकाप्रमुख पदाच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात ठेवण्यात ये यशस्वी झाले होते. तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळताना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा जिंकून आणण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती. राजनीती आणि समाजकारण याच्या जोरावर तालुक्यातील सर्व सत्ताकेंद्रात त्यांनी एकहाती सत्ता गाजवली होती. राजकारणातील यशस्वी तालुकाप्रमुखांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते.
राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. काँग्रेस मध्येही त्यांनी काही काळ तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. सध्या ते शिवसेनेत कार्यरत होते.मात्र प्रकृतीच्या अस्वस्थ्यामुळे ते सक्रिय राजकारणापासून अलिप्त होते.
त्यांना मूत्रपिंडाचा तसेच मधुमेहाचा त्रास होता. त्यात रविवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर मूळगावी नाधवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

अभिप्राय द्या..