जिल्हाधिकारी के.मंजू लक्ष्मी यांनी केली करुळ घाटमार्गाची पाहणी..

जिल्हाधिकारी के.मंजू लक्ष्मी यांनी केली करुळ घाटमार्गाची पाहणी..


वैभववाडी /-


सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी करुळ घाटमार्गाची पहाणी केली.घाटमार्गाची दुरुस्ती लवकरात लवकर करुन घाटमार्ग वाहातूकीस खुल्ला करावा.अशा सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता श्री.कुमावत, श्रीमती पाटील, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता पी.व्ही.कांबळे,शाखा अभियंता शुभम गुंडये, पोलिस निरीक्षक अतुल जाधव, मंडल अधिकारी पावसकर, आदी अधिकारी उपस्थितीत होते.
अतिवृष्टीमुळे दिनांक १२ जुलै रोजी करुळ घाटमार्गात पायरीचा घाट या ठिकाणी घाटरस्ता खचला आहे.खबरदारी म्हणून प्रशासनाने या मार्गावरील वाहातूक पूर्णपणे बंद केली आहे.सध्या या घाटमार्गातील वाहातूक भुईबावडा घाटातून सुरु आहे.
दरम्यान आमदार नितेश राणे यांनी गेल्या मंगळवारी घाटमार्गाची पहाणी केली होती.यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना युध्दपातळीवर काम करुन घाटमार्ग लवकरात लवकर वाहातूकीस खुला करण्याबाबत सक्त सुचना दिल्या होत्या.त्यानंतर गुरुवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून खचलेल्या रस्त्याचे दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.माञ पावसाची संततधार सूरु असल्यामुळे या कामात व्यत्यय येत आहे.दरम्यान सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी घाटमार्गातील खचलेल्या भागाची पहाणी करुन दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण करुन घाटमार्ग वाहातूकीस खुला करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

अभिप्राय द्या..