जि.प.आणि पं.स.सदस्य असोसिएशन प्रदेश कार्याध्यक्षपदी उदय बने यांची निवड..

जि.प.आणि पं.स.सदस्य असोसिएशन प्रदेश कार्याध्यक्षपदी उदय बने यांची निवड..

रत्नागिरी /-

जि. प. आणि पं. स. सदस्य असोसिएशन प्रदेश कार्याध्यक्षपदी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने यांची निवड झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जि. प. व पं. समिती सदस्य यांचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
असोसिएशनच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री. बने यांचे सर्वथरातून अभिनंदन होत आहे. या निवडीनंतर बोलतांना श्री. बने म्हणाले की, जिल्हा परिषदेचे आरक्षण पाच वर्षांनी बदलते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे काम आणखी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आरक्षणाचा कालावधी वाढविण्यात यावा अशी मागणी राहणार आहे. याशिवाय ७३ आणि ७४वी घटना दुरुस्ती नुसार स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकार जाणून घेऊन त्याचा अभ्यास करणे, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य यांचे अधिकार सुरक्षित करणे, त्यांच्यामध्ये जनजागृती करणे, त्यांच्या विविध मागण्या आणि कार्यरत असताना उद्भवणाऱ्या समस्यां कशा सोडवाव्यात, शासकीय योजनांची माहिती घेणे असा आपला प्रयत्न राहणार असल्याचे बने यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..