शिरंगे पुनर्वसन मध्ये लाईफटाईम हॉस्पिटल मार्फत केली नेत्ररोग तपासणी..

शिरंगे पुनर्वसन मध्ये लाईफटाईम हॉस्पिटल मार्फत केली नेत्ररोग तपासणी..

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुक्यातील पुनर्वसित गाव शिरंगे बोडण येथे गुरुवार दि.१७ जुलै रोजी ग्रामपंचायत शिरंगे बोडण व लाईफटाईम हॉस्पिटल पडवे संयुक्त विद्यमाने नेत्ररोग तपासणी व संबंधित आजारांवरील शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.शिबीराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी व करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सोशल डिस्टन्शिंगच्या नियमाचे पालन करत रुग्णाची नेत्र तपासणी करण्यात आली.आमदार नितेशजी राणे यांच्या सहयोगातुन तपासणी दरम्यान ज्या रुग्णांना मोतीबिंदू असेल त्या रुग्णांवर कमी खर्चात मोतीबिंदू शस्त्रक्रिया लाईफ टाईम मेडिकल काँलेज पडवे येथे करण्यात येणार असून कोरोना कालावधीत आरोग्य या विषयात आपण सदैव तालुकावासियांसोबत असून सर्वांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी विविध उपक्रम घेण्यात येणार त्यात ग्रामस्थांचे सहकार्य मिळेल,असा आशावाद सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिशा दळवी यांनी यावेळी व्यक्त केला.या शिबिराचा ७० जणांनी लाभ घेतला.यावेळी भाजप तालुकाध्यक्ष प्रविण गवस,संजय गवस,बोडण उपसरपंच लवू गवस,खानयाळे सरपंच विनायक शेटवे,आरोग्यसेवक प्रमोद तळणकर,आरोग्यसेविका सौ.ठाकर,लाईफटाईम हॉस्पिटलचे हरीश्चंद्र परब तसेच शिरंगे बोडण गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..