दोडामार्ग ./-

खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे या प्रश्नासमोर अद्याप देखील प्रश्नचिन्हच असताना,आता रस्त्या संबंधी एक वेगळीच बाब समोर येताना दिसत आहे,आता तर नदीत रस्ता की रस्त्यात तून नदी वाहते हा प्रश्न दोडामार्ग वासियांना पडला आहे दोडामार्ग हा सिंधुदुर्ग मधील एक दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो मुळात पर्यटक म्हणून दोडामार्ग मध्ये येणारा प्रत्येक पर्यटक दोडामार्गच्या रस्त्यावरूनच ओळखतो की दोडामार्ग किती दुर्गम आहे अशातच आता तर दोडामार्ग मधील सासोली येथे चक्क रस्त्यावरून नदी वाहताना दिसत आहे,नक्की रस्ता कुठून आहे असा वाहनचालकांन समोर पडलेला प्रश्न आहे रस्त्यावरून नदी वाहत असल्याने रस्त्यात खड्डे कुठे आहेत याचा देखील वाहनचालकांना अंदाज येत नाही यामुळे दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे असा हा रस्ता असून हाच रस्ता दोडामार्गमध्ये येण्यासाठी महत्वपुर्ण मानला जातो परंतु बाहेरून येणाऱ्या पर्यटकाला हाच राजमार्ग आहे की काय असा प्रश्न पडतो परंतु येथील दोडामार्ग वासियांना मात्र याची सवयच पडली आहे, सततच्या या खड्डेमय जीवनातून प्रवास करत वाहनाच्या इंधना बरोबरच वाहनाचा दुरुस्ती खर्च देखील वाढलेला दिसत आहे, त्यातच कोरोनाने मांडलेला थैमान आणि आर्थिक मंदी पाहता दोडामार्ग वर पडलेले हे रस्त्याचे संकट काय दूर होताना दिसत नाही बांधकाम विभागाला मात्र याचे काहीही पडलेले नाही, त्यातच पालकमंत्र्यांचे आगमन दोडामार्गात होते हे बांधकाम विभागाला समजले असता बांधकाम विभागाने रस्त्यालगत गटार नसल्याने सर्व पाणी रस्त्यावर साचून रस्त्यावरून वाहत असलेले पाणी रस्त्यालगत असलेल्या संदीप देसाई ह्या शेतकऱ्यांच्या शेतात सोडले त्यामुळे त्याच्या शेतीचे नुकसान झाले असता, पालकमंत्री येतानाच तुम्ही रस्त्यावरचे पाणी बाहेर का करता अन्य वेळी ते पाणी रस्त्यावरूनच वाहत असते त्यावेळी तुम्ही त्याकडे लक्ष का देत नाही असा सवाल देखील त्या शेतकऱ्याने केला आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन वरून खडसावून देखील काढले, आपण कोणत्या स्थितीत राहतो हे पालकमंत्र्यांना देखील कळणे गरजेचे आहे असा सवाल देखील त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलताना केला आपली पंधरा एकर शेती असून वरील शेती रस्त्यावरील पाणी भरून नापीक होते त्यामुळे आपण ती शेती सोडली आहे तर रस्त्यालगत असलेली दुसरी खालील शेती आपण करत असतो आणि त्यातही आता गटार नसल्याने रस्त्यावरील पाणी त्या शेती मध्ये देखील सोडले जाते यामुळे आपले मात्र कायम नुकसान होते, हे सतत चालू राहिल्यास आपण खायचे काय यासाठी आपण गप्प बसणार नाही तर गुराढोरांना घेत संपूर्ण कुटुंबासहित बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा देखील त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून संदीप देसाई ह्या शेतकऱ्याने दिला आहे तर या विषयी त्यांनी सवांद साधत ह्या गोष्टी स्पष्ट केल्या, बांदा हा राज्य मार्ग मानला जातो मुख्यता हा रस्ता दोडामार्गला जोडला जाणारा मुख्य रस्ता असून जर मुख्य रस्ता असा आहे तर गावपातळीवर रस्ते आहेत तरी कि काय असा प्रश्न दोडामार्ग मध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला पडतो आणि यातूनच दोडामार्ग ची दुर्गमता सिद्ध होताना दिसते, मात्र बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार काय थांबताना दिसत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page