You are currently viewing तब्बल चार तासांनंतरही निकालाची संकेतस्थळे बंदच…

तब्बल चार तासांनंतरही निकालाची संकेतस्थळे बंदच…

विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांत तीव्र नाराजी


सिंधुदुर्ग /-

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक परीक्षा मंडळाने इयत्ता १० वीच्या सन २०२०-२१ शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा बोर्डचा अंतिम निकाल आज दुपारी १.०० वाजता ऑनलाइन जाहीर होणार सांगितले होते. मात्र तब्बल ४ तासांपेक्षा अधिक काळ लोटून गेला तरीदेखील इयत्ता १० वीच्या विद्यर्थ्यांचा रिझल्ट अद्यापही पालकांना व विद्यार्थ्यांना ऑनलाइन मिळू शकलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी होणाऱ्या १० वीच्या बोर्ड परीक्षा शासनाने रद्द करून इयत्ता ९ वी चे मार्क व इयत्ता १० वी प्रकल्प अहवाल, तोंडी परीक्षा, विद्यार्थी उपस्थिती, एकूण शालेय प्रगतीचा आढावा याचा आधार घेऊन शालेय स्तरावर वर्ग शिक्षक व विषय शिक्षक यांचेकडून अंतिम गुणांक घेऊन गुणांक पद्धतीने इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा बोर्डाचा अंतिम रिझल्ट बनविण्यात येणार होता. पालकांना देखील रिझल्ट लवकर लागेल, अशी उत्सुकता व अपेक्षा होती. मात्र सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सर्वांच्या आनंदावर विरजन पडले आहे.

आज दुपारी १.०० वाजल्यापासून सर्व पालक व विद्यार्थी शासनाने दिलेल्या अंतिम निकाला संदर्भातील सगळ्या वेब साईट चेक करून रिझल्ट कुठे दिसतो का, हे पाहत होते. मात्र साईटच ओपन होत नसल्यामुळे पालक व विद्यार्थी नाराज झाले आहेत. माध्यमिक हायस्कुल मधील मुख्यध्यापकांना संपर्क साधून १० वी च्या निकाला संदर्भात माहिती जाणून घेतली असता संपूर्ण राज्यातच ही परिस्थिती असून निकाल साईट हँग व सर्व्हर डाऊन झाले असल्यामुळे तसेच साईट ओपन होत नसल्यामुळे आम्ही देखील हतबल झालो असल्याचे खारेपाटण हायस्कूलचे मुख्यध्यापक श्री. आकीवटे यांनी सांगितले.


अभिप्राय द्या..