वैभववाडी तालुक्यात राष्ट्रीय कबड्डी दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा..

वैभववाडी तालुक्यात राष्ट्रीय कबड्डी दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा..

मुंबईचे जेष्ठ पंच कै.बुधाजी खवळे यांच्या परिवारास महाराष्ट्र राज्य कबड्डी पंच परिवारातर्फे आर्थिक मदत..

वैभववाडी /-
कबड्डी महर्षी बुवा तथा शंकरराव साळवी यांचा जन्मदिवस म्हणजेच राष्ट्रीय कबड्डी दिन या निमित्ताने यावर्षीपासून प्रथमच महाराष्ट्र राज्य कबड्डी पंच परिवारातर्फे मृत्यू पावलेल्या आपल्या ज्येष्ठ आजी-माजी सहकारी पंच यांच्या कुटुंबीयांना फुल ना फुलाची पाकळी स्वरूपात मदत करण्याचे ठरविण्यात आले होते त्याप्रमाणे मुंबईचे जेष्ठ पंच कै. बुधाजी खवळे यांच्या पत्नी श्रीमती दिशा बुधाजी खवळे यांना भुईबावडा तालुका वैभववाडी येथे त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन महाराष्ट्र राज्य कबड्डी पंच परिवारातर्फे आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय पंच मधुकर पाटील, राज्य पंच तुळसणकर सर, राज्य पंच देवकर सर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. के .एस. पाटील, कुणाल चव्हाण, संतोष वारंगे उपस्थित होते.

अभिप्राय द्या..