केंद्राचे निकष बाजूला ठेवत सिंधुदुर्गसाठी ४५ कोटी ४९ लाखाची नुकसानभरपाई..

केंद्राचे निकष बाजूला ठेवत सिंधुदुर्गसाठी ४५ कोटी ४९ लाखाची नुकसानभरपाई..

चक्रीवादळ नुकसानभरपाईची मुख्यमंत्र्यांची शब्दपूर्ती पालकमंत्री सामंत यांची माहिती..

मालवण /-


सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यानंतर त्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दौरा जो दौरा केला त्या दौर्‍यावरून विरोधकांनी टीका टिपणी केली. या टीकेला उत्तर देत केंद्र शासनाचे निकष बदलत जिल्ह्याची जी ४५ कोटी ४९ लाख रुपयांची मागणी होती. ते सर्व पैसे उपलब्ध करून देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे बोलताना केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ आज येथील दैवज्ञ भवन येथे पालकमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महिला आघाडी समन्वयक पूनम चव्हाण, नगरसेविका सेजल परब, मंदार केणी, नितीन वाळके, भाई कासवकर, बाबा सावंत, किरण वाळके यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामंत म्हणाले, शिवसंपर्क अभियान हे दरवर्षी राबविले जाते. संघटनात्मक आणि सामाजीक काम करण्यासाठी या अभियानाचा उपयोग केला जातो. शिवसैनिक हा कोणत्याही निवडणुकीला सामोरे जायला तयार आहे. कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे अभियान राबविले जात नाही.

अभिप्राय द्या..