मसुरेत विज कर्मचाऱ्यांना रेनकोट व मास्क वाटप!

मसुरेत विज कर्मचाऱ्यांना रेनकोट व मास्क वाटप!

मसुरे /-

मसुरे विभागातील सर्व वीज वितरण कर्मचाऱ्यांना रेनकोट, मास्क व सॅनिटायझर बॉटलचे वाटप मसुरे बाजारपेठ नजीक साई मंदिर येथे करण्यात आले.माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर व उद्योजक समीर प्रभुगावकर यांच्या वतीने सदर साहित्य देण्यात आले. यावेळी वीज कर्मचारी स्वप्नील धामपूरकर, अमीत बागवे,विनोद परब,
प्रफुल्ल परब, रुपेश सावंत यांचा सत्कार करण्यात आला. तौक्ते वादळ तसेच इतर वेळी सुद्धा येथील वीज कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत राखण्यासाठी घेत असलेली मेहनत कौतुकास्पद असते अशा शब्दात उद्योजक समीर प्रभुगावकर यांनी वीज कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी उद्योजक समीर प्रभुगावकर, रणवीर प्रभुगावकर, विक्रांत प्रभुगावकर, बबन मसुरकर, प्रदीप पाटकर, बाळू दळवी, पंढरीनाथ मसुरकर,अवधूत चव्हाण, नीळकंठ शिरसाट,दुशंत शिरसाट, शैलेश मसुरकर, बबन खोत, दीपक शिंदे, स्वप्नील दुखंडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. आभार पंढरीनाथ मसुरकर यांनी मानले.

अभिप्राय द्या..