वेंगुर्ला /-
वेंगुर्ले तालुक्यात १२ व १३ जुलै रोजी च्या अहवालात एकूण २८ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये सागरतीर्थ ३, वजराट ७, मठ ३, दाभोली २, आडेली ४, शिरोडा २, वेतोरे १, उभादांडा कांबळीवाडी २ व वेंगुर्ले शहर एरियात ४ इत्यादी ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.