सोनवडे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर तर गोवेरी,माड्याचिवाडी गावामद्धे आरोग्य उपकेंद्र मंजूर..

सोनवडे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर तर गोवेरी,माड्याचिवाडी गावामद्धे आरोग्य उपकेंद्र मंजूर..

आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश..

कुडाळ /-

आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ११ ठिकाणी नवीन आरोग्य उपकेंद्रे मंजूर करण्यात आली असून कुडाळ तालुक्यातील सोनवडे गावात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. तसेच यामध्ये कुडाळ तालुक्यातील गोवेरी व माड्याचीवाडी या दोन गावांमध्ये नवीन आरोग्य उपकेंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. जिल्ह्यात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्राचे प्रस्ताव आरोग्य विभागाने राज्यशासनाकडे पाठविले होते. कुडाळ तालुक्यातील हे प्रस्ताव मंजुरीसाठी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सोनवडे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच गोवेरी व माड्याचीवाडी गावांमध्ये आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. कुडाळ ,मालवण तालुक्यातील इतर ठिकाणी देखील आरोग्य केंद्र मंजुरीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

अभिप्राय द्या..