जिल्हा परिषदेच्या शाळांना पुरविलेल्या वॉटर क्युरिफायरमध्ये ५०लाखचा भ्रष्टाचार.;गटनेते नागेंद्र परब यांचा आरोप..

जिल्हा परिषदेच्या शाळांना पुरविलेल्या वॉटर क्युरिफायरमध्ये ५०लाखचा भ्रष्टाचार.;गटनेते नागेंद्र परब यांचा आरोप..

सिंधुदुर्गनगरी /-

प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून शाळांना पुरविलेल्या वॉटर क्युरिफायरमध्ये ५० लाख रुपये आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला आहे, असा आरोप सेनेचे गटनेते नागेंद्र परब यानी आरोप केल्याने जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ झाला. सत्ताधारी भाजपने याला जोरदार आक्षेप घेत प्रत्येक वेळी भ्रष्टाचाराचा आरोप करून जिल्हा परिषदेची बदनामी करु नये, असे सांगितले. यावेळी वॉटर क्युरिफायर बाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांची समिती नियुक्त करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बुधवारी दुपारी संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, विषय समिती सभापती महेंद्र चव्हाण, डॉ अनिशा दळवी, शर्वाणी गांवकर, अंकुश जाधव, सत्ताधारी गटनेते रणजीत देसाई, विरोधी गटनेते नागेंद्र परब, रेश्मा सावंत, सरोज परब, संतोष साटविलकर यांच्यासह बहुतांश सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाने समर्पक उत्तरे दिली नसल्याने सदस्य प्रदीप नारकर यानी पूर्ण सभा उभे राहून आत्मक्लेश केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह नीट परीक्षा केंद्र सिंधूदुर्ग जिल्ह्यात सुरु केल्याने नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, खा विनायक राऊत, आ नितेश राणे यांचा अभिनंदन ठराव घेण्यात आला.

अभिप्राय द्या..