सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरेंना सर्वाधिक मते..

मुंबई /-

मुख्यमंत्र्यांबाबत घेतलेल्या सर्वेचे रेटिंग जाहीर केेले आहे. यात पहिल्या राऊंडमध्ये 13 राज्ये निवडण्यात आली होती.सध्या देशातील अनेक राज्याचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहेत. उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये विद्यमान मुख्यमंत्र्यांबाबत नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. तर नुकतंच उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पदावरून तिरथ सिंह रावत यांना पायऊतार व्हावं लागलं. दरम्यान, आता प्रश्नमने मुख्यमंत्र्यांबाबत घेतलेल्या सर्वेचे रेटिंग जाहीर केेले आहे.यात पहिल्या राऊंडमध्ये 13 राज्ये निवडण्यात आली होती. या राज्यांत देशातील 67 टक्के लोकसंख्या आहे. बिहार, गोवा, गुजरात, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगना, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा यामध्ये समावेश आहे.याबाबतचे वृत्त द प्रिंटने दिले आहे.

नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडु, केरळ, आसाम या राज्यांचा यात समावेश नाही. तसंच आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात पॅनेल नसल्यानं तिथं सर्व्हे करता आला नाही. पुढच्या फेरीत या राज्यांमध्ये सर्व्हे होईल अशी आशा प्रश्नमकडून व्यक्त करण्यात आली आहे.13 राज्यात मिळून 17 हजार 500 जणांनी या सर्व्हेमध्ये सहभाग घेतला होता. मुख्यमंत्र्यांच्या रेटिंगबाबत घेण्यात आलेला सर्वात मोठ्या सर्व्हेपैकी एक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सर्व्हेमध्ये..

  1. मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब आहे आणि त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये
  2. कामगिरी चांगली असली तरी पुन्हा मत देणार नाही..

3.मुख्यमंत्र्यांचे काम चांगले आहे आणि पुढच्यावेळी हेच मुख्यमंत्री हवेत. असे पर्याय देण्यात आले होते.

लोकप्रिय मुख्यमंत्री कोण यावर उत्तर देताना सर्वाधिक मते ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मिळाली आहेत. सर्व्हेमध्ये जवळपास 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असल्याचं आणि त्यांना पुन्हा मत करू असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या खालोखाल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना 44 टक्के मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या स्थानी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आहेत.

सर्व्हेनुसार, लोकप्रिय नसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे पहिल्या क्रमांकावर आहेत. 60 टक्के मतदारांनी त्यांची कामगिरी खराब असून ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नकोत असं म्हटलं आहे. तर 15 टक्के लोकांनी त्यांच्या कामगिरीबाबत समाधन व्यक्त केलं पण पुन्हा मत देण्यास इच्छूक नसल्याचं म्हटलं आहे.उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांबाबत सर्वाधिक नकारात्मक उत्तर मतदारांनी दिलं आहे. नुकतंच तिथं नव्या मुख्यमंत्र्यांकडे राज्याची सूत्रे सोपवली असली तरी तिथल्या आधीच्या नेतृत्वाबाबत 80 मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची कामगिरी खराब असून पुन्हा मुख्यमंत्री नकोत असं मत दिलं आहे. उत्तराखंड आणि पंजाबनंतर यादीत गुजरातचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये विजय रुपानी मुख्यमंत्री आहेत. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ हे पाचव्या स्थानी आहेत.उत्तराखंड, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पुढच्यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page