You are currently viewing संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिरवल कोविड सेंटर मधील कोरोना योद्ध्यांचा सत्कार

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिरवल कोविड सेंटर मधील कोरोना योद्ध्यांचा सत्कार

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून उपक्रम..

कणकवली /-

शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आला.यावेळी सन्मानपत्र, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन २४ आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना महामारी विरुद्ध आरोग्य विभागाचे सर्वच कर्मचारी लढत आहेत.त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आ. वैभव नाईक यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, नगरसेवक सुशांत नाईक, कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, संस्था संचालक सतीश नाईक, खजिनदार मंदार सावंत, मंजूनाथ फडके, निलेश मोहिते, रवींद्र मिरजोळे आदी उपस्थित होते. शिरवल कोविड सेंटर मधील आरोग्य कर्मचारी निखिल जाधव, डॉ. सागर पटेल,डॉ. सुविधा टिकले, डॉ. प्रशांत कांदे, डॉ. श्रावणी काणेकर, डॉ. प्रसन्ना पाटील, डॉ. धनश्री जाधव, डॉ. दीक्षा वाघमारे, अश्वीनी तावडे, सुविधा सावंत, गणेश ऐनर, बाजीराव पालवे, समिधा भोगले, तेजश्री राऊळ, स्नेहा गोसावी, सोनिया पवार, रेणुका वरवडेकर, विठू वरक, बाबुराव कांबळी, किरण माने, पांडुरंग गुरव, गुरुनाथ मेस्त्री, सुजय ठाकूर, शामली राणे यांचा सत्कार करण्यात आला.

अभिप्राय द्या..