म्हापण येथे घरावर झाड पडून नुकसान..

म्हापण येथे घरावर झाड पडून नुकसान..

वेंगुर्ला /-


तालुक्यातील म्हापण चव्हाणवाडी येथील बाळकृष्ण अर्जुन म्हापणकर यांच्या घरावर मंगळवारी सकाळी आठ वाजता आंब्याचे कलम पडून ८ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत तलाठी ए. व्ही.गावकर,कोतवाल पी.आर.कोनकर यांनी पंचयादी केली आहे.यावेळी सरपंच अभय ठाकूर,उपसरपंच अशोक पाटकर,ग्रामविकास अधिकारी तुषार हळदणकर यांनी पाहणी केली आहे.यावेळी चंद्रकांत चव्हाण,विजय ठाकूर,महेश दाभोलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान आज बुधवारी १३१.६ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून तालुक्यात एकूण १४०५.१८ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला.

अभिप्राय द्या..