सावंतवाडी तालुक्यातील टाळवडेतील युवकाची नैराश्येतून गळफासलावून आत्महत्या..

सावंतवाडी तालुक्यातील टाळवडेतील युवकाची नैराश्येतून गळफासलावून आत्महत्या..

सावंतवाडी/-

तळवडे येथील एका युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार आज पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. अमोल अनिल गावडे (२६), असे त्याचे नाव आहे. त्याने मानसिक नैराश्येतून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल हा काल रात्री आपल्या खोलीत झोपला होता. दरम्यान पहाटे घरातील नातेवाईक त्याला घेण्यासाठी गेले असता दरवाजा आतून बंद होता. यावेळी दरवाजा तोडून त्यांनी आत प्रवेश केला असता तो गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक आण्णासो बाबर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याने मानसिक नैराश्यातून ही आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद यांनी दिली.

अभिप्राय द्या..