पोलीस कॉन्स्टेबल भूषण सुतार यांनी<br>बी निगेटिव्ह या दुर्मिळ ब्लड ग्रुपचे रक्तदान करून वाचवले महिलेचे प्राण..

पोलीस कॉन्स्टेबल भूषण सुतार यांनी
बी निगेटिव्ह या दुर्मिळ ब्लड ग्रुपचे रक्तदान करून वाचवले महिलेचे प्राण..

कणकवली /-

सिंधुदुर्ग पोलीस दलात कणकवली डीवायएसपी कार्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल भूषण सुतार यांनी दुर्मिळ बी निगेटिव्ह ब्लडग्रुपचे रक्तदान करून सावंतवाडी तालुक्यातील महिलेचे प्राण वाचवले आहेत. अन्नपूर्णा गुणाजी राऊळ या महिलेवर आज 14 जुलै रोजी होणाऱ्या ऑपरेशन साठी सावंतवाडी येथे दुर्मिळ अशा बी निगेटिव्ह रक्ताची तातडीची गरज असल्याचे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष महेश राऊळ यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी कळविले असता महेश राऊळ यांनी याबाबत रक्तदाते भूषण सुतार यांना मंगळवार 13 जुलै रोजी कल्पना दिली. भूषण सुतार यांनी 14 जुलै रोजी सकाळी ड्युटीवर हजर व्हायचे होते. ऑपरेशन 14 जुलै रोजी सकाळी असल्याने वेळ वाया न घालवता मध्यरात्री पावणे एक वाजता पोलीस कॉन्स्टेबल भुषण सुतार यांनी कणकवलीतून ओरोस येथील रक्तपेढीत जात रक्तदान केले. भूषण सुतार यांनी समयसूचकता दाखवत केलेल्या दुर्मिळ रक्तगटाच्या रक्तदानामुळे अन्नपूर्णा राऊळ या महिलेचे प्राण वाचले आहेत. भूषण सुतार यांचे याबाबत कौतुक होत आहे.

अभिप्राय द्या..