ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्यासंदर्भात भाजपा कुडाळ शिष्टमंडळाची कुडाळ आगार प्रमुखांशी चर्चा..

ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्यासंदर्भात भाजपा कुडाळ शिष्टमंडळाची कुडाळ आगार प्रमुखांशी चर्चा..

येत्या आठ दिवसात बसेस चालू करा अशी कुडाळ भाजपची जोरदार मागणी..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची शहरातील बाजारपेठ , तहसीलदार कार्यालय ,बँका असतील वा इतर ठिकाणी कामानिमित्त येण्याकरिता तसेच विद्यार्थी दाखल्या करिता विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्याकरिता खाजगी वाहनांच्या माध्यमातून आर्थिक भुर्दंड पडू नये याकरिता कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये एस.टी .बसेस सोडण्यात याव्यात आणि या बसेसच्या फेऱ्या सुरू करून सर्व प्रवाशांना आणि नागरिकांना दिलासा मिळावा याकरिता भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने कुडाळ येथील आगार प्रमुख श्री सुजित डोंगरे यांच्याशी चर्चा केली या चर्चेमध्ये भाजपाचे निलेश तेंडुलकर ,युवा नेते आनंद शिरवलकर ,जिल्हा चिटणीस बंड्या सावंत ,शहराध्यक्ष राकेश कांदे यांनी भाग घेतला त्याचबरोबर कुडाळ बस स्थानक येथील प्रवासी शेड आणि बैठक व्यवस्था संदर्भातही शहराध्यक्ष राकेश कांदे यांनी लक्ष वेधले यावेळी तालुका उपाध्यक्ष देवेंद्र नाईक, शक्ती केंद्रप्रमुख राजू बक्षी ,जनार्दन कुडाळकर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..