You are currently viewing आता,पालकांच्या बँक खात्यात पोषण आहाराचे अनुदान होणार जमा.;शिक्षक परिषदेच्या प्रयत्नाला यश….

आता,पालकांच्या बँक खात्यात पोषण आहाराचे अनुदान होणार जमा.;शिक्षक परिषदेच्या प्रयत्नाला यश….

सिंधुदुर्ग, /-

उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहाराचे अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डी बी टी द्वारे थेट हस्तांतरित करण्याबाबत पंचवीस जून रोजीच्या पत्रान्वये शिक्षण संचालक प्राथमिक यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना कळविले होते कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची बँक खाती उघडणे हे अडचणीचे जिकरीचे व आर्थिकदृष्ट्या न परवडणारे असल्याने शिक्षक परिषदेने सदर अडचणीची तात्काळ दखल घेत दिनांक 28 जून रोजी राज्याचे शिक्षण संचालक प्राथमिक यांना ई-मेलद्वारे निवेदन देऊन सदर पोषण आहाराचे अनुदान पालकांच्या खात्यात वर्ग करण्याची विनंती निवेदनाद्वारे केली होती शिक्षक परिषदेने याबाबत केलेला पत्रव्यवहार व वर्तमानपत्रात आलेल्या विविध जिल्ह्यातील बातम्या मा मुख्यमंत्री व मा उपमुख्यमंत्री यांना ई-मेल द्वारे पाठविण्यात आल्या होत्या याद्वारे शिक्षकांच्या अडचणींची वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न शिक्षक परिषदेने केलेला होता.

शिक्षक परिषदेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शालेय शिक्षण विभागाकडून दिनांक 13 जुलै रोजी शिक्षण संचालकांना शालेय पोषण आहाराचे अनुदान पालकांच्या बँक खाती वर्ग करण्याची सूचना लेखी पत्राद्वारे देण्यात आली आहे त्या अनुषंगाने राज्याध्यक्ष श्री राजेश सुर्वे यांनी शिक्षण संचालक प्राथमिक यांना संपर्क केला असता शिक्षण संचालक कार्यालयाकडून लवकरच पत्र निर्गमित करुन राज्यातील सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी यांना शालेय पोषण आहार अनुदानासाठी पालकांची बँक खाती ग्राह्य धरली जाणार असल्याचे पत्र निर्गमित केले जाणार असून या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांनी शिक्षक परिषदेने केलेल्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन व कौतुक केले आहे.

राज्याध्यक्ष राजेश सुर्वे कार्यवाह सुधाकर मस्के कोषाध्यक्ष संजय पगार संघटन मंत्री सुरेश दंडवते कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे बाबुराव पवार राज्य संपर्क प्रमुख रावसाहेब रोहकले सहसंपर्कप्रमुख दिलीप पाटील उपाध्यक्ष डॉ सतपाल सोवळे अविनाश तालापल्लीवार प्रकाश चतरकर संजय शेळके राज्य सहकार्यवाह प्रकाश चुनारकर पुरुषोत्तम काळे राजेंद्र चौधरी कार्यलीयन मंत्री भगवान घरत मराठवाडा विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र जायभाये अमरावती विभागीय अध्यक्ष गजानन देवके यांनी शासनाचे आभार मानले असल्याचे राज्य प्रसिद्धिप्रमुख श्री रविकिरण पालवे यांनी कळविले आहे.अशी माहिती लोकसंवाद लाईव्ह न्यूज चॅनल शी बोलताना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री.गणेश नाईक यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..