You are currently viewing आडेलीत ९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

आडेलीत ९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-


आडेली गावात मंगळवारी एकूण ९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.यामध्ये आडेली दाभाडी येथे ३ व्यक्ती व आडेली जांभरमळा येथे ६ व्यक्ती व वजराट देवसू येथे १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.संजीवनी पाटील यांनी दिली आहे.दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह संख्या वाढत असल्याने नागरिकांनी शासन कोव्हिड नियमांचे पालन करावे,असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..