बी डी एस परीक्षेत विद्यामंदिर परुळेच्या यशवंतने पटकावले सुवर्ण पदक..

बी डी एस परीक्षेत विद्यामंदिर परुळेच्या यशवंतने पटकावले सुवर्ण पदक..

परुळे।-


सन 2021 मध्ये घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (बीडीएस) परीक्षेत अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर परुळेच्या (तालुका वेंगुर्ले) यशवंत सत्यवान सामंत याने 100 पैकी 89 गुण मिळवून सुवर्ण पदक पटकावले. या यशाबद्दल यशवंत व त्याचे पालक यांचे अभिनंदन संस्था पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व ग्रामस्थ यांनी केले आहे.

राष्ट्रीय स्तरावरच्या या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी प्रविष्ट होत असतात. गणित, विज्ञान व बुद्धिमत्ता या विषयावर आधारित या परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवत इयत्ता नववीत शिकणाऱ्या यशवंतने या परीक्षेत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अभिप्राय द्या..