वेंगुर्लेतील मच्छिमार्केटचे आज ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण..

वेंगुर्लेतील मच्छिमार्केटचे आज ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले शहरातील सुसज्ज अशा मच्छिमार्केट इमारतीचे आज रविवार ११ जुलै ला केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी दिली आहे.
गेली कित्येक वर्षे वेंगुर्लेवासियांना प्रतिक्षा असलेल्या वेंगुर्ले मच्छिमार्केटचे ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता लोकार्पण होणार आहे. यावेळी लोकार्पण ठिकाणी खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण, आमदार दिपक केसरकर,आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी,जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर जिल्हाधिकारी जोशी, जिल्हा न. प. प्रशासन अधिकारी वैभव साबळे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसिलदार प्रविण लोकरे यांच्यासहित भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते, काँग्रेस बाळा गावडे, कार्याध्यक्ष विलास गावडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.अद्ययावत असे हे मच्छिमार्केट उभारण्यात आले असून यात रेन वोटर हार्वेस्टिंग, फायर हायड्रट सिस्टीम, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, कोल्ड स्टोरेजची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या मच्छिमार्केट मधील सांडपाणी हे प्रक्रिया होऊन गटारात सोडले गेल्यामुळे स्वछतेबाबतही योग्य काळजी घेण्यात आलली आहे. तसेच याठिकाचा कचरा गोळा करून पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील कचरा थेट पार्किंग मध्ये बसवण्यात आलेल्या ट्रॉलीमधे जाणार आहे. दिव्यांग व वयोवृद्ध यांच्यासाठी रॅम्प व लिफ्ट ची व्यवस्था ही करण्यात आली आहे. तसेच सुसज्ज पार्किंग, शौचालय व बाथरूम ची व्यवस्थाही याठिकाणी करण्यात आली आहे. अशी माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली आहे.यावेळी
उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ,
गटनेते सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रशांत आपटे,नगरसेविका शितल आंगचेकर, साक्षी पेडणेकर
मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..