You are currently viewing मागण्या पूर्ण न झाल्यास स्वातंत्र्यदिनी आंदोलन !

मागण्या पूर्ण न झाल्यास स्वातंत्र्यदिनी आंदोलन !

सिधुदूगनगरी /-

शासन जाहिरात धोरण तसेच शासन आदेशाची पायमल्ली करत साप्ताहिकांच्या जाहिराती अन्यायकारक पणे बंद करणाऱ्या नगरपंचायत, नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी. या मागणीसाठी (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनी, असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडिया संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा असोसिएशन ऑफ स्मॉल, मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडिया संघटनेच्यावतीने आज जिल्हाधिकारी के.मंजू लक्ष्मी यांना दीलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांनी शासनाचा आदेश पाळ णे बंधनकारक असते. असे असूनही शासन जाहिरात धोरण तसेच शासन आदेशाची पायमल्ली करत जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी साप्ताहिकाना जाहिरात देणे बंद करून अन्याय केला आहे. याबाबत संबंधित अधिकारी यांच्यासह पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून लक्ष वेधण्यात आले. तरी गेली दोन वर्षे याबाबत न्याय मिळालेला नाही. या अन्यायाचा निषेध करण्यासाठी व न्याय मिळावा यासाठी येत्या १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. काही अधिकारी शासन आदेश जुमानत नाहीत. जिल्ह्यातील नगर परिषद नगर पालिका तसेच नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शासन आदेशाची पायमल्ली करत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. त्याचप्रमाणे साप्ताहिकांच्या जाहिराती पूर्ववत चालू कराव्यात. या मागणीसाठी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया च्या जिल्हा कार्यकारणी च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ ऑगस्ट रोजी आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले यावेळी दिव्या वायंगणकर, सीमा मराठे, राजू तावडे, संजिविनी देसाई, नंदकिशोर महाजन, दिलीप हिंदळेकर ,राजेंद्र खांडेळेकर आदी साप्ताहिकाचे संपादक, कार्यकारी संपादक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..