कणकवली न.पं.च्या कोविड सेंटरला पीपीई किट नगराध्यक्ष समीर नलावडे याच्याकडे उद्योजक राजू मानकर यांच्याकडून सुपूर्द..

कणकवली न.पं.च्या कोविड सेंटरला पीपीई किट नगराध्यक्ष समीर नलावडे याच्याकडे उद्योजक राजू मानकर यांच्याकडून सुपूर्द..

कणकवली /-

कणकवली शहर कोरोनामुक्त करण्यासाठी कणकवली न.पं. च्या कोविड सेंटरमध्ये अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उद्योजक राजू मानकर यांनी सामजिक बांधिलकीतुन पिपीई किट,मास्क व सँनिटायझर किट देण्यात आले. कणकवली न.पं.च्या नगराध्यक्ष दालनात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे हे साहित्य सुपूर्त केले.यावेळी नगरसेवक अभिजित मुसळे, बंडू गांगण,किशोर राणे, प्रथमेश चव्हाण,प्रज्वल वर्दम आदि उपस्थित होते. उद्योजक राजू मानकर हे सामजिक बांधिलकी जपत नेहमीच गरजुंना मदतीचा हात देतात.याच उदात्त हेतूने आज कणकवली कोविड सेंटरमधील वैद्यकीय कर्मचार्यांना देखील त्यांनी कोविड प्रतिबंधक वस्तू सुपूर्त केले.त्यांच्या या दातृत्वाबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आभार मानले.

अभिप्राय द्या..