रोटरी क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षपदी साईप्रसाद हवालदार यांची निवड…

रोटरी क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षपदी साईप्रसाद हवालदार यांची निवड…

महिलांना सक्षम, मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याचे दिले आश्वासन

सावंतवाडी /-

रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी च्या नूतन अध्यक्षपदी उद्योजक साईप्रसाद हवालदार यांची निवड झाल्या नंतर २०२१-२०२२ या रोटरीच्या नव वर्षात महिलांना सक्षम करण्यासाठी नव नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच प्रामुख्याने सर्व मुलींना शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच वृक्षारोपण, रक्तदान शिबिर अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच प्रामुख्याने सावंतवाडी तालुक्यातील लोकांसाठी प्रामुख्याने नवीन उपक्रम राबविण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष साईप्रसाद हवालदार यांनी दिली आहे.
यावेळी सहसचिव वसंत करंदीकर, सचिव सुधीर नाईक, आनंद रासम, सत्यजित धारणकर, प्रमोद भागवत, प्रदीप शिवडे, दिलीप म्हापसेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..