You are currently viewing सांगुळवाडी कोव्हिड सेंटर मध्ये औषधांच्या नावाखाली रुग्णांची लुट.;पं.स.च्या बैठकीत सदस्य मंगेश लोके यांचा आरोप..

सांगुळवाडी कोव्हिड सेंटर मध्ये औषधांच्या नावाखाली रुग्णांची लुट.;पं.स.च्या बैठकीत सदस्य मंगेश लोके यांचा आरोप..

वैभववाडी /-

पंचायत समितीची मासिक सभा आज पं.स.च्या सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी सांगुळवाडी येथील कोवीड केअर सेंटर मधील कर्मचारी रुग्णांना खाजगी रुग्णालयातुन पैसे घेऊन अथवा बाहेरून औषधे आणायला लावतात असा आरोप सदस्य मंगेश लोके यांनी केला. औषधांच्या नावाखाली दोन ते तीन हजार रुपये घेऊन रुग्णांची लुट केली जात असल्याचा आरोप लोके यांनी केला. कोवीड केअर सेंटर मधील या प्रकाराबाबत माझ्याकडे पुरावे असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. कोवीड केअर सेंटरमधील या घोळाला कोण जबाबदार? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. आरोग्य विभागाला या प्रकरणाची माहिती नाही का? की आरोग्य विभागाचा याला पाठिंबा आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून तात्काळ दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोके यांनी केली आहे. या प्रकरणी मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यातील दोषींना सोडणार नाही असा इशारा लोके यांनी दिला आहे.

अभिप्राय द्या..