You are currently viewing विनापरवाना बंदूक बाळगल्या प्रकरणी दारिस्तेत एकाला अटक.;एलसीबी ची कारवाई..

विनापरवाना बंदूक बाळगल्या प्रकरणी दारिस्तेत एकाला अटक.;एलसीबी ची कारवाई..

कणकवली /-

विना परवाना सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक बाळगल्याप्रकरणी तालुक्यातील दारिस्ते पवारवाडी येथिल सुनील राजाराम पवार (४५) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच बंदूक जप्त करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दारीस्ते येथे एका व्यक्ती जवळ विनापरवाना सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक शाहू देसाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, हवालदार ए. ए. गंगावणे, चंद्रकांत श्रावण नार्वेकर, कृष्णा केसरकर, रवी इंगळे, पी. पी. गावडे यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. त्यावेळी दारिस्ते पवारवाडी येथिल भवानी मंदिराजवळील सुनील राजाराम पवार याच्या घरा जवळील गवताच्या माचात सुमारे २५००० रुपये किमतीची विनापरवाना काडतुसाची बंदूक आढळून आली. ती जप्त करण्यात आली.

या कारवाईनंतर जप्त केलेला मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिला. याबाबतची तक्रार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे चंद्रकांत श्रावण नार्वेकर यांनी दिली आहे. पोलिसांनी सुनील पवार याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..