दिक्षा नाईक एकपात्री अभिनय स्पर्धेत राज्यात प्रथम..

दिक्षा नाईक एकपात्री अभिनय स्पर्धेत राज्यात प्रथम..

मालवण /-

स्नेहांश एंटरटेन्मेंट, कणकवली’ आयोजित भव्य राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये कुमारी दिक्षा प्रमोद नाईक हिने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा राज्यातूनही स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या सर्व स्पर्धकांमधून कुमारी दिक्षा प्रमोद नाईक हिने उत्कृष्ट अभिनय, हावभाव आणि अचूक शब्दफेक यांच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळविला.दिक्षाला यापूर्वीही ” झुल्बी ” या लघुपटातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल राज्यस्तरीय स्पर्धेत बेस्ट ॲक्टर म्हणून गौरवण्यात आले होते. नृत्यक्षेत्रातही ती अव्वल असून अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. तिच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिक्षाच्या या यशामध्ये तिचे गुरू रवि कुडाळकर,शेखर सातोस्कर, शेखर गवस आणि तिच्या पालकांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे.

अभिप्राय द्या..