You are currently viewing राज्य सरकार पडेल या भीतीने भाजपच्या १२ आमदारांना विधानसभेतून निलंबित.;खासदार नारायण राणे यांचा आरोप..

राज्य सरकार पडेल या भीतीने भाजपच्या १२ आमदारांना विधानसभेतून निलंबित.;खासदार नारायण राणे यांचा आरोप..

सिंधुदुर्ग /-

राज्य सरकार पडेल या भीतीने केवळ आपले सरकार वाचवून आपले दुकान चालू ठेवण्यासाठी आज भाजपच्या १२ आमदारांना विधान सभेतून निलंबित करण्यात आले, असा घणागाती आरोप माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज पडवे येथील आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद सदस्य रणजित देसाई आदी उपस्थित होते. विधानसभा सभागृहात गोंधळ घालताना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या तब्बल १२ सदस्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे. यावरून नारायण राणे आक्रमक होत म्हणाले, केवळ हे कारण नसून राज्य सरकार पडेल याच भीतीने केवळ आपले सरकार वाचविण्यासाठी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले, असे राणे म्हणाले. यावेळी तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना लवकरच नुकसान भरपाई भेटेल, असेही राणे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

अभिप्राय द्या..