You are currently viewing वेंगुर्ले – मठ गावातील थोर व्यक्तिमत्त्व अनंत ठाकूर यांचे निधन..

वेंगुर्ले – मठ गावातील थोर व्यक्तिमत्त्व अनंत ठाकूर यांचे निधन..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावडदेववाडी येथील रहिवासी,
मठ गावचे मानकरी,
माजी पोलिसपाटील अनंत लक्ष्मण ठाकूर यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुलगे,२ मुली,सुना, जावई,नातवंडे असा परिवार आहे.काजू उत्पादनातील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आंबा – काजू बागायतदार विलास ठाकूर,पंचम खेमराज महाविद्यालयचे प्रा.डॉ.शिवराम ठाकूर,प्रा.महेंद्र ठाकूर यांचे ते वडील होत.तसेच माजी जि.प.सदस्य सुखदा ठाकूर यांचे ते सासरे होत.पोष्टमास्टर म्हणून त्यांनी सेवा बजावली.तसेच पोलिसपाटील म्हणून ३८ वर्षे सेवा देताना त्यांनी आदर्श कार्य केले होते.पोलिसपाटील म्हणून आडेली,वेतोरेचाही अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता.श्री देव स्वयंभू वगैरे देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष,श्री स्वयमेश्वर प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मठ चे माजी अध्यक्ष,सदस्य तसेच खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक म्हणून त्यांनी सेवा बजाविली. त्यांच्या निधनाने मठ गावातून व सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

अभिप्राय द्या..