सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी शाखा वैभववाडी मार्फत गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव..

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी शाखा वैभववाडी मार्फत गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव..

वैभववाडी/-

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सह. पतपेढीच्या वैभववाडी शाखेत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभासदांचे इयत्ता दहावी, बारावी, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थी व सन 2019-20 सालचा जि. प.सिंधुदुर्ग उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
कोरोना संसर्गामुळे शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष नामदेव उर्फ दादा जांभवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाला माजी. अध्यक्ष तथा विद्यमान संचालक ए. डी. राणे,माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान संचालक राजेंद्रप्रसाद गाड, माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान संचालिका स्नेहलता राणे, माजी अध्यक्ष तथा विद्यमान स्थानिक संचालक संतोष मोरे ,माजी अध्यक्ष सुनील चव्हाण , माजी उपाध्यक्ष शरद नारकर, माजी उपाध्यक्ष संजय पाताडे, संघटना प्रतिनिधी रफिक बोबडे, केंद्रप्रमुख रामचंद्र जाधव त्याचप्रमाणे सभासद प्रशांत रासम, विजय केळकर, अंकुश सुतार ,विलास पाष्टे, बाळू भांड, शोभा केळकर, नेहा केळकर, अस्मिता सुतार, पालक ,जागृती मोरे, सागर रामाणे, शाखाधिकारी अनुराधा माईणकर,अमोल पळसंबकर व विद्यार्थी वृंद उपस्थित होते.
यावेळी आदर्श शिक्षक प्रशांत रासम, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी कु. अथर्व मोरे. कु. ईश्वरी केळकर, कु. काव्या चव्हाण, कु. सोहम भांड,इयत्ता दहावीमध्ये तालुक्यात प्रथम आलेली कु. सलोनी सुतार, बारावीतील गुणवंत विद्यार्थी कु. सर्वेश पाष्टे, यांना मा. अध्यक्ष, संचालक, व मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले . अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष श्री. नामदेव जांभवडेकर म्हणाले प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या चढत्या आलेखात सभासद हे खूप मोलाची भूमिका निभावत असून आम्हा सभासदांची ही गुणवंत मुले म्हणजे आम्हा शिक्षकांची अस्मिता आणि उज्ज्वल भारताची शान आहेत, त्यांनी यापुढेही असेच उत्तुंग यश संपादन करण्यासाठी ही कौतुकाची थाप आहे असे गौरोदगार काढले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल सर्व मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीम स्नेहलता राणे यांनी केले. तर प्रास्ताविक व आभार संतोष मोरे यांनी मानले.

अभिप्राय द्या..