कन्या वनसमृद्धी योजने अंतर्गत खांबाळे येथे रोपे वाटप..

कन्या वनसमृद्धी योजने अंतर्गत खांबाळे येथे रोपे वाटप..


वैभववाडी/-

१ जुलै महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्याने कन्या वनसमृद्धी योजनेअंतर्गत वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत वैभववाडी यांच्यावतीने ग्रामपंचायत खांबाळे येथे रोपे वाटप कार्यक्रम करण्यात आला.
एप्रिल २०२० ते मे २०२१ या दरम्यान जन्मलेल्या कन्याच्या पालकांना कन्या वनसमृद्धि योजनेअंतर्गत प्रत्येकी दहा रोपे देऊन सन्मानित करण्यात आले.खांबाळे गावचे सरपंच गौरी गणेश पवार, उपसरपंच गणेश प्रकाश पवार यांचे हस्ते लाभार्थ्यांना रोपे वाटप करण्यात आली.
यावेळी वैभववाडी सामाजिक वनीकरणचे वनपाल प्रकाश पाटील वनमजूर तात्या ढवण, खांबाळे ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
फोटो:कन्या समृद्धी योजने अंतर्गत लाभार्थ्यांना रोपे वाटप करतांना मान्यवर.छाया:(मोहन पडवळ)

अभिप्राय द्या..