कुडाळ तालुका व्यापारी संघाच्यावतीने जिल्हाआरोग्य अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांच्या लसीकरणासंदर्भात निवेदन..

कुडाळ तालुका व्यापारी संघाच्यावतीने जिल्हाआरोग्य अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांच्या लसीकरणासंदर्भात निवेदन..

कुडाळ /-

कोविड १९ लसिकरणसाठी व्यापान्यांना प्राधान्य देणेबाबत..कोविड १९ चा प्रसार जिल्हयात प्रामुख्याने कुडाळ शहरात मोठया प्रमाणात होत आहे. व्यापारी वर्ग व ग्राहकांचा थेट संबंध येत असल्याने कोरोना संसर्ग वाढत आहे व त्याचाच फटका शहरातील व्यापान्यांना बसला असून कुडाळ तरुण व जेष्ठ व्यापारी मृत्युच्या दाढेत ओढले गेले आहेत.कुडाळ तालुक्यात आपल्या विभागा अंतर्गत लसिकरण मोहिम राबविली जाते. परंतु ८० टक्के ऑनलाईन व २० टक्के ऑफलाईन असल्यामुळे व्यापाऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. तरी कुडाळ तालुक्यातील व्यापारांना प्रामुख्याने शहरातील व्यापारांसाठी ऑफलाईन पध्दतीने ३०० डोस कुडाळ मारुती मंदिर धर्मशाळा येथे देण्यात यावेत जेणेकरुन व्यापाऱ्यांना त्याचा लाभ होऊन कोरोना प्रसार होण्यास अटकाव होईल.सदरचे लसिकरण १८ वर्षे ते ४५ वर्षे वयोगटातील व्यापाऱ्यांना तसेच ४५ वर्षे वरील व्यापारांना एकाच वेळी करण्यात यावे.लसिकरण मोहिमेचा व्यापारांना फायदा होण्यासाठी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची ज्या व्यापारी बंधुना पत्र देण्यात येईल त्यानांच लसिकरण करण्यात यावे. जेणेकरून गर्दी होणार नाही च व्यापाऱ्यानांच लसीकरण होईल. लसिकरण मोहिमेसाठी लागणारी जागा श्री देव मारुती मंदिर देवस्थान धर्मशाळेमध्ये उपलब्ध करुन देण्यास तयार आहोत.असे कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी निवेदन देते वेळी सांगितले.यावेळी अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्यासोबत कुडाळ तालुका. सेक्रेटरी भूषण मठकर ,खजिनदार नितेश महाडेश्वर ,सहसचिव महेश ओटावणेकर ,अवधूत शिरसाट जयराम डिगसकर ,शार्दुल घुर्ये उपस्थित होते.

अभिप्राय द्या..