You are currently viewing पळसंब येथे कृषी संजीवनी कार्यक्रमाचा शुभारंभ!

पळसंब येथे कृषी संजीवनी कार्यक्रमाचा शुभारंभ!

मसुरे /-

कृषी संजीवनी मोहिम कार्यक्रमाचा शुभारंभ मालवण तालुक्यातील पळसंब बौध्दवाडी येथे हळद लागवड क्षेत्रात करण्यात आला. यावेळी पळसंब सरपंच श्री .चद्रकांत गोलतकर, तालुका कृषी अधिकारी श्री .विश्वनाथ गोसावी, मंडळ अधीकारी अजित गवंडे, कृषी सेवक श्री .अस्विन कुरकुटे, शेतकरी जयेद्र परब, बबन पुजारे,जयश्री परब,लक्ष्मण जूवेकर,उर्मिला जूवेकर, पळसंबकर आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यानी हळद पिकाची पाहणी करत अनेक योजनांची माहिती शेतकऱ्याना दिली. जास्तीत जास्त पडीक क्षेत्र लागवडीखाली आणण्याचे आवाहन त्यांनी केले. सरपंच चंद्रकांत गोलतकर यानी गावाच्या वतीने सर्वांचे आभार मानले

अभिप्राय द्या..