मुणगेत सेलम हळद बियाणे वाटप!

मुणगेत सेलम हळद बियाणे वाटप!

मसुरे /-

आमदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मुणगे गावातील बचत गट व शेतकरी यांना भाजपच्या वतीने मोफत हळद बियाणे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांनी हळद शेतीकडे व्यवसाय म्हणून बघून आपली आर्थिक उन्नती साधावी.उत्पादित हळद शेतकऱ्यां कडून चांगला दर देऊन विकत घेण्यात येणार आहे. मुणगे गावाच्या विकासासाठी आमदार नितेश राणे यांनी आपला निधी दिलेला आहे.यापुढे हि मुणगे गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणून विकासकामे केली जातील असे भाजप नेते गोविंद सावंत यांनी यावेळी सांगितले .
यावेळी सरपंच सौ .साक्षी गुरव, उपसरपंच श्री धर्माजी आडकर, ग्रा पं सदस्य श्री दशरथ मुणगेकर, ग्रा पं सदस्य श्री संजय घाडी, शेतकरी संजय परूळेकर, अशोक बागवे, अरविंद सावंत, मनोज सावंत, सतिश पेडणेकर, बाबू मुणगेकर ,विजय मुणगेकर, अंकिता घाडी, ग्रा पं सदस्य सौ परी नाटेकर व इतर शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..