शिक्षकांचा संशोधन कोर्स तयार करण्यासाठी प्रसाद बागवे यांची निवड

शिक्षकांचा संशोधन कोर्स तयार करण्यासाठी प्रसाद बागवे यांची निवड

मसुरे

राज्यातील शिक्षकांसाठी कृती संशोधन कोर्स ( ब्लॅंडेड स्वरूप) तयार करण्यात येत आहे. या पथदर्शी अभ्यासासाठी देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल आणि कै विणा सुरेश बांदेकर ज्यू कॉलेजचे प्रभारी मुख्याध्यापक प्रसाद नंदकुमार बागवे यांची निवड जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांनी केली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथील संशोधन विभागाद्वारे राज्यातील शिक्षकांसाठी सदर कृती संशोधन कोर्स तयार करण्यात आला आहे.तो दीक्षा ऍप वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पथदर्शी अभ्यासासाठी प्राथमिक व माध्यमिक विभागातून पाच शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. प्रसाद बागवे यांच्या सह उभादांडा वेंगुर्ले येथील दिलीप माने, दाभोली वेंगुर्ले येथील प्रशांत चिपकर, दीपक तानाजी डावर( सौदळे- देवगड), जयवंत कुंभार ( कुवळे- देवगड) या प्राथमिक विभागातील शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. प्रसाद बागवे यांच्या निवडी बद्दल संस्था अध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, संस्था व्यवस्थापक आबा पुजारे यांनी अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..