राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्यावतीने रेडी येथे रेनकोटचे वाटप..

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्यावतीने रेडी येथे रेनकोटचे वाटप..

वेंगुर्ला /-


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त
युवक काँग्रेसच्या वतीने,रेडी जिल्हा परिषद मतदार संघात शिरोडा गावातील शेतकऱ्यांना पावसाळी रेनकोटचे वाटप करण्यात आले.या वेळी वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती तथा सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष सिद्धेश उर्फ भाई परब,वेंगुर्ले तालुका काँग्रेसचे पदाधिकारी कृष्णा आचरेकर, रेडी जि. प. यु. काँ. अध्यक्ष चंदन हाडकी,शिरोडा युवक काँग्रेस अध्यक्ष जगन्नाथ गावडे, सरचिटणीस आनंद गोडकर,गौरव परब,आबा मसुरकर,समिर आचरेकर,निकी परब,आपा गावडे तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.

अभिप्राय द्या..