वेंगुर्लेत काँग्रेसच्यावतीने ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा..

वेंगुर्लेत काँग्रेसच्यावतीने ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुका काँग्रेसच्या वतीने वेंगुर्ले तहसिल कार्यालयासमोर काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी राहुलजी को लाना है – देशको बचाना है,राहुलजी को लाना है – किसानको बचाना है, राहुलजी को लाना है – बेरोजगारी हटाना है,राहुलजी को लाना है – मंहगाई घटाना है, नरेंद्र मोदी – किसान विरोधी अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी केंद्र सरकारने केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांची होळी करण्यात आली.यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख,तालुका अध्यक्ष व नगरसेवक विधाता सावंत,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष जगन्नाथ डोंगरे,तालुका सेवादल अध्यक्ष विजय खाडे,तालुका सरचिटणीस उत्तम चव्हाण,शहर अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश डिचोलकर,नगरसेवक आत्माराम उर्फ दादा सोकटे,नगरसेविका स्नेहल खोबरेकर, एन.एस. यु.आय.तालुका अध्यक्ष शुभम गावडे, अंकुश मलबारी,समिर नागवेकर,सागर नांदोसकर,देवेंद्र सातोसकर,अक्षय डोंगरे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..