भारतीय हवाई दलात निवड झालेल्या प्रज्वलच्या आई वडिलांचा मनसेकडून सत्कार.;शर्मिला राज ठाकरेंच्याही कुळकर्णी परिवारास शुभेच्छा..

भारतीय हवाई दलात निवड झालेल्या प्रज्वलच्या आई वडिलांचा मनसेकडून सत्कार.;शर्मिला राज ठाकरेंच्याही कुळकर्णी परिवारास शुभेच्छा..

कुडाळ /-

भारतीय हवाई दलामध्ये कुडाळचा सुपुत्र प्रज्वल कुलकर्णी यांची फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर फादर्स डे चे औचित्य साधून मनसेच्या वतीने आज त्यांच्या आईवडिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनसेच्या नेत्या सौ. शर्मिला राज ठाकरे यांनीही प्रज्वलच्या आई-वडिलांना शुभेच्छा दिल्या.दरम्यान कोकणात आल्यावर आपण नक्कीच भेटू असे आश्वासन सौ.शर्मिला ठाकरे यांनी कुळकर्णी परिवारास यावेळी सांगितले.

प्रज्वल अनिल कुलकर्णी यांच्या आई-वडिलांचा फादर्स डे चे औचित्य साधून जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी शाल ,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.धीरज परब यांच्या मोबाईल वरून सौ.शर्मिला राज ठाकरे यांनी प्रज्वलच्या आई-वडिलांना शुभेच्छा दिल्या.प्रज्वलच्या पोस्टिंग विषयी सर्व माहीती जाणुन घेतली.प्रज्वल च्या पुढील वाटचालीसाठी मनसे सिंधुदुर्ग कडून खूप खूप शुभेच्छा दिल्या यावेळी शहराध्यक्ष सिद्धेश कुटाळे, उपतालुका अध्यक्ष जगन्नाथ गावडे ,उपविभाग अध्यक्ष विष्णू मस्के, महाराष्ट्र सैनिक आदिलशहा आदी मनसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..