आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना -भाजपच्या ४० कार्यकर्त्यांनवर गुन्हा दाखल..

आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना -भाजपच्या ४० कार्यकर्त्यांनवर गुन्हा दाखल..

कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरेंची माहिती…

कुडाळ /-

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त पेट्रोल विक्रीवरून झालेल्या राड्या प्रकरणी मनाई तसेच जमावबंदीचा आदेश झुगारल्या प्रकरणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते व भाजप कार्यकर्ते मिळून तब्बल ४० जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.

पोलीस निरीक्षक शंकर कोरेंची माहिती…

शिवसेना वर्धापनदिनाचे औचित्य साधून कुडाळ शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पेट्रोल पंपवर १०० रुपयांत प्रति वाहन दोन लिटर

पेट्रोल तर भाजप सदस्यांवाचे ओळखपत्र दाखवणाऱ्याला १ लिटर मोफत पेट्रोल देणार असल्याचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केलं. त्यानंतर काल आमदार वैभव नाईक व त्याचे कार्यकर्ते पेट्रोल पंप वर आल्यानंतर भाजप सेना कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. वातावरण तंग झालं. मात्र यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदीचं उल्लंघन केलं. याप्रकरणी सेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह सेना भाजपच्या ४० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुडाळ पोलीस स्थानकात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १४१, १४३, १४९, १८८, २६९, २७० या कलमा खाली शिवसेनेचे आमदार वैभव नाईकांसह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती श्री. कोरे यांनी दिली.

अभिप्राय द्या..