कुडाळ /-

परशुराम उपरकर हे शिवसेनेत होते तेव्हा शिवसेनेने त्यांना निष्ठावंत म्हणून विधानपरिषदेची आमदारकी बहाल केली. मात्र आमदारकीच्या ६ वर्षात त्यांनी शिवसेनेसाठी काहीच योगदान दिलेले नाही. आमदारकीचे पद उपभोगून झाल्यानंतर मात्र त्यांनी पदांच्या आशेने मनसेत प्रवेश केला. उपरकर यांच्या प्रवेशाअगोदर मनसेत अनेक लोकप्रतिनिधी कार्यरत होते. त्यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमही राबविले जात होते. मनसेची ओळख तरुणाईचा पक्ष म्हणून होती. मात्र उपरकर मनसेत गेल्यानंतर कोणत्याही प्रकरणात सेटलमेंट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून मनसेची ओळख निर्माण झाली असल्याचे सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्यांमधून जाणून येते. सेटलमेंटच्या प्रकरणामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसे रसातळाला गेली असल्याची खोचक टीका शिवसेना पावशी विभाग प्रमुख दिपक आंगणे यांनी केली आहे.

कुडाळ /-

उपरकर शिवसेनेत असताना आज जशी जिल्ह्यात मनसेची अवस्था आहे तशी शिवसेनेची होती. उपरकर शिवसेनेत असताना ज्या प्रभागात ते राहतात त्या प्रभागात त्यांनी दिलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराला १२ मते मिळाला होती. उपरकर मनसेत गेल्यानंतर झालेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांनी दिलेल्या मनसेच्या उमेदवारांना देखील १५ पेक्षा जास्त मते मिळाली नाहीत. मनसेचा एकही लोकप्रतिनिधी ते निवडून आणू शकले नाहीत.जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर पेपर मधून टीका करण्यापलीकडे त्यांना काही जमणार नाही एखादा लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची क्षमता त्यांच्यात नाही. मनसेतील जुन्या कार्यकर्त्यांना ते मानसन्मान देऊ शकले नाहीत त्यामुळे उपरकर यांच्या त्रासाला कंटाळून मनसेच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांनी उपरकर यांच्यापासून फारकत घेतली असल्याचे कळते. त्यामुळे उपरकर यांनी मनसे पक्ष वाढीसाठी किती योगदान दिले याचे त्यांनी आत्मचिंतन करावे.

मात्र खासदार विनायक राऊत यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याची धुरा दिल्यानंतर सिंधुदुर्गात शिवसेना वाढत चालली आहे. स्वतः ते दोन वेळा निवडून आले आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे दोन आमदार,अनेक जिल्हा परिषद ,पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच निवडून आले आहेत. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे देखील शिवसेनेत आल्यानंतर निष्ठावंत शिवसैनिकांप्रमाणेच काम करत आहेत. ते शिवसेना कार्यकर्त्यांना मान सन्मानाची वागणूक देतात नेहमी कार्यकर्त्यांमध्ये राहून ते विरोधकांच्या आरे… ला कारे.. करण्याची भूमिका बजावतात. त्यामुळेच आम्ही शिवसैनिक आ. वैभव नाईक यांच्या पाठीशी ठाम आहोत.असे शिवसेनेचे पावशी उपसरपंच दिपक आंगणे यांनी आज कुडाळ येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page