You are currently viewing विश्व हिंदु परिषद वेंगुर्लेमार्फत परबवाडा आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविकांना पीपीई किटचे वाटप..

विश्व हिंदु परिषद वेंगुर्लेमार्फत परबवाडा आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविकांना पीपीई किटचे वाटप..

वेंगुर्ला /-


विश्व हिंदु परिषद वेंगुर्ले मार्फत तालुक्यातील परबवाडा आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविकांना पीपीई किट चे वाटप करण्यात आले.आरोग्यसेविका कायम आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना सेवा देतात. यासाठी त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून हे किट त्यांना देण्यात आले. यावेळी विश्व हिंदु परिषद वेंगुर्ले अध्यक्ष अरूण गोगटे, प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, सुहास गवंडळकर,उपसरपंच संतोष सावंत, माजी उपसरपंच संजय मळगांवकर, ग्रा.पं.सदस्य हेमंत गावडे,तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुनिल परब, ग्रामसेवक संदिप गवस, विलास दळवी, सायमन अल्मेडा, कांता देसाई, डाॅ. बाळू गवंडे, मनवेल फर्नांडिस, समिर चिंदरकर,आरोग्य सेविका एस. व्ही. आंबेरकर व के. एस. मोरजकर आदी उपस्थित होते.किट चे वाटप केल्याबद्दल आरोग्य सेविकांनी विश्व हिंदु परिषद वेंगुर्लेचे आभार व्यक्त केले.

अभिप्राय द्या..