You are currently viewing आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांच्या राज्यस्तरीय संपात मसुरेतील आशा सहभागी!

आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांच्या राज्यस्तरीय संपात मसुरेतील आशा सहभागी!

मसुरे /-

कोरोना महामारीत आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक अनेक मागण्या प्रलंबित असल्याने बेमुदत संपावर गेल्या आहेत. या संपात मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आशा वर्कर्स ही सहभागी झाल्या असल्याची माहिती मसुरे येथील आशा कर्मचाऱ्याकडून देण्यात आली असून तशाप्रकारचे पत्र मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्र आशा कर्मचारी समन्वय समिती कडून १५जून पासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता. समिती कडून महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, सिंधुदुर्ग आशा वर्कर्स संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. कोरोना काळात देवदूत ठरलेल्या राज्यातील ६८ हजार आशा सेविका संपावर गेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन ने सुद्धा यात सहभागी होत काम बंद केले आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला संपाचा फटका बसणार असल्याने संपाबाबत राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे राज्यातील ६८ हजार आशा सेविकांचे लक्ष लागले आहेत.
१५जून पासूनच्या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व आशा आणि गटप्रवर्तक सहभागी झाल्या असून मसुरे येथे गटप्रवर्तक सौ पल्लवी नाचणकर, आशा सेविका सौ. अंकिता मेस्त्री, सौ. अर्चना धुरी,सौ दिव्या जोशी, सौ. जया खोत, सौ. ज्योती पाटकर, सौ. मानसी परब, सौ. प्राची कदम, सौ. प्रणाली चव्हाण, सौ. ऋतिका ठाकूर, सौ. प्रज्ञा फणसे, सौ. नाझीया शेख, सौ. समीरा कांबळी, सौ. प्रिया आजगावकर, श्रीमती सीमा मेहता, सौ. रसिका नेरकर, सौ. संध्या कांदळगावकर, सौ. सायली चव्हाण, सौ. सिद्धी वंजारे, सौ सुप्रिया नाचनकर, सौ स्वाती वेलणकर आदी सहभागी झाल्या होत्या.

अभिप्राय द्या..